[80+] वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा? | Vakprachar list with Meaning in Marathi

Rate this post

vakprachar in marathi : आजच्या या लेखात आपण मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ पाहणार आहोत. अनेकदा परीक्षेत वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा असा प्रश्न विचारला जातो. म्हणून जर आपणास सर्व vakprachar in marathi माहीत असतील तर या सारख्या प्रश्नांची उत्तरे आपण सहज लिहू शकतात.

शब्दसमूहांचा मराठी भाषेत वाक्यात वापर करताना त्यांच्या नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्द समूहास वाक्प्रचार अथवा भाषेतील संप्रदाय असे म्हणतात.

म्हणजेच वाक्प्रचार हा शब्दश (सरळ) असलेल्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ प्राप्त झालेला शब्द समूह असतो. मराठी भाषेत शारीरिक अवयवांवर मोठ्या प्रमाणात वाक्प्रचार उपलब्ध आहेत. 

उदारणार्थ :

  • सर्वस्व पणाला लावणे.

अर्थ : सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे.

  • साखर पेरणे.

अर्थ : गोड गोड बोलून आपलेसे करणे.

  • सामोरे जाणे.

अर्थ : निधड्या छातीने संकटास तोंड देणे.

येथे आपण मराठी वाक्प्रचार व अर्थ आणि  marathi vakprachar with meaning पाहणार आहोत. जे आपल्याला मराठी च्या परीक्षेत आणि रोजच्या बोलण्यात महत्वाची भूमिका बजावनार तर चला जाणून घेऊया मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग | Marathi Vakprachar vakyat upyog | मराठी वाक्प्रचार

मराठी वाक्प्रचार व अर्थ मराठी – Marathi vakprachar with meaning

  • अंग चोरणे- फारच थोडे काम करणे.
  • अंगाची लाही लाही होणे-अतिशय संताप येणे.
  • अंगात वीज संचारणे- अचानक बळ येणे.
  • अंगवळणी पडणे- सवय होणे.
  • उर भरून येणे- गदगदून येणे.
  • कपाळ फुटणे- दुर्दैव ओढवणे.
  • कपाळमोक्ष होणे- मृत्यू येणे, अचानक येणाऱ्या संकटाने उध्वस्त होणे.
  • कपाळाला हात लावणे- हताश होणे, निराश होणे.
  • काढता पाय घेणे- विरोधी परिस्थिती पाहून निघून जाणे .
  • कानउघाडणी करणे- चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे.
  • कान उपटणे- कडक शब्दात समजावणे.
  • कान टोचणे- खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे.
  • कान निवणे- ऐकुन समाधान करणे.
  • कान फुंकणे- चुगली- चहाडी करणे.
  • कानाने हलका असणे- कशावरही पटकन विश्वास ठेवणे.
  • कानामागे टाकणे- दुर्लक्ष करणे.
  • कानाला खडा लावणे- एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे.
  • कानावर हात ठेवणे- नाकबूल करणे.
  • कानीकपाळी ओरडणे- एक सारखे बजावून सांगणे.
  • कानावर घालणे- लक्षात आणून देणे.
  • कानोसा घेणे- अंदाज किंवा चाहूल घेणे.
  • केसाने गळा कापणे- घात करणे.
  • कंठ दाटून येणे- गहिवरून येणे.
  • कंठस्नान घालने- शिरच्छेद करणे.
  • कंठाशी प्राण येणे- खूप कासावीस होणे.
  • कंबर कसणे- जिद्दीने तयार होणे.
  • कंबर खचणे- धीर सुटणे.
  • खांद्याला खांदा भिडवने- सहकार्य व एकजुटीने काम करणे.
  • गळा काढणे- मोठ्याने रडणे.
  • गळा गुंतणे- अडचणीत सापडणे.
  • गळ्यात गळा घालणे- खूप मैत्री करणे.
  • गळ्यातला ताईत होणे- अत्यंत आवडता होणे.
  • गळ्यापर्यंत बुडणे- कर्जबाजारी होणे, डबघाईला येणे.
  • चेहरा खुलने- आनंदित होणे.
  • चेहरा पडणे- लाज वाटणे, खजील होणे.
  • छाती दडपणे- घाबरून जाणे.
  • जिभेला हाड नसणे- वाटेल ते बोलणे.
  • जीव की प्राण असणे- अत्यंत प्रिय असणे. 
  • डोक्यावर खापर फोडणे- निर्दोष माणसावर दोष टाकणे.
  • डोक्यावर बसवणे- फाजील लाड करणे.
  • डोळा असणे- नजर/पाळत ठेवणे.
  • डोळा लागणे- झोप येणे.
  • डोळे उघडणे-अनुभवाने सावध होणे.
  • डोळेझाक करणे- दुर्लक्ष करणे.
  • डोळे निवणे- समाधान होणे.
  • डोळे पांढरे होणे- धक्कादायक प्रसंग निर्माण होणे.
  • डोळ्यात अंजन घालणे- चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे.
  • डोळ्यात खुपणे- मत्सर करणे.
  • डोळ्यात धूळ फेकणे- खोटेनाटे सांगून फसवणे.
  • डोळ्याला डोळा न लागणे- झोप न येणे.
  • डोळ्याचे पारणे फिटणे- समाधान होणे किंवा पाहून आनंदित होणे.
  • डोळे विस्फारणे- आश्चर्याने पाहणे.
  • डोळ्यातून थेंब न काढणे- मोठा आघात होऊनही न रडणे.
  • तळपायाची आग मस्तकात जाणे- अतिशय संतापने.
  • तोंड काळे करणे- कायमचे निघून जाणे.
  • तोंडघशी पडणे- विश्वास घात होणे / अडचणीत येणे.
  • तोंडचे पाणी पळणे- अतिशय घाबरणे.
  • तोंड देणे- सामना करणे
  • तोंड फिरवणे- नाराजी व्यक्त करणे.
  • तोंड भरून बोलणे- मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे.
  • तोंड वेंगाडणे- याचना करणे.
  • तोंड सांभाळून बोलणे- जपून बोलणे.
  • तोंड सुख घेणे- दोष देताना वाटेल तसे बोलणे.
  • तोंडाची वाफ दवडणे- वायफळ बडबड करणे.
  • तोंडात बोट घालणे- आश्चर्यचकित होणे.
  • तोंडात शेण घालणे- पराकोटीची निंदा करणे.
  • तोंडाला कुलूप घालणे- गप्प बसणे.
  • तोंडाला तोंड देणे- भांडणे.
  • तोंडाला पाणी सुटणे- हाव निर्माण होणे.
  • दात ओठ खाणे- चीड व्यक्त करणे.
  • दात धरणे- सूड घेण्याची भावना बाळगणे.
  • दात विचकणे- निर्लज्जपणे असणे.
  • दाताच्या कण्या करणे- वारंवार विनंती करणे.
  • दाती तृण धरणे- शरण जाणे.
  • नजर चुकवणे- न दिसेल अशी हालचाल करणे. 
  • नवल वाटणे- आश्चर्य वाटणे, चकित होणे.
  • नाक उडवणे- थट्टा, उपास करणे
  • नाक कापणे- थट्टा उपहास करणे
  • नाक खुपसणे- नको त्या गोष्टीत उगाच सहभाग घेणे
  • नाक घासणे- लाचार होऊन माफी मागणे.
  • नाक मुरडणे- नापसंती दाखवणे, उपहास करणे
  • नाकाने कांदे सोलने- जास्तीचे शहाणपण दाखवणे
  • नाकी नऊ येणे- फार दमणे
  • पदरात घेणे- स्वीकारणे
  • पदरात घालने- चूक पटवून देणे
  • पाठ थोपटने- शाबासकी देणे, कौतुक करणे
  • पाठीशी घालणे- संरक्षण देणे
  • पाठ दाखवणे- समोरून पळून जाणे
  • पाठ पुरवणे- सारखे मागे लागणे
  • पाठबळ असणे- आधार असणे
  • पाठीला पोट लागणे- उपाशी राहिल्याने हाडकुळा होणे
  • पाठ न सोडणे- एखाद्या गोष्टीचा पिच्चा पुरवणे
  • पाढा वाचणे- सविस्तर सांगणे
  • पाणी दाखवणे- सामर्थ्य दाखवणे
  • पाणी पडणे- वाया जाणे, नष्ट होणे
  • पाणी मुरणे- कपटाने काहीतरी लपवून ठेवणे
  • पाणी पाजणे- पराभव करणे
  • पाणी सोडणे- अशा सोडणे
  • पाय काढणे- विरोधी परिस्थिती लक्षात घेऊन निघून जाणे
  • पाय घसरणे- तोल जाणे, मोहात फसणे
  • पायबंद घालने- आळा घालणे
  • पाय मोकळे करणे- फिरायला जाणे
  • स्वतःच्या पायावर उभे राहणे- स्वतंत्र किंवा स्वावलंबी होणे
  • पोटात कावळे कोकळणे- खूप भूक लागणे
  • पोटात ठेवणे- गुपित सांभाळून ठेवणे
  • पोटात शिरणे- मोठ्या चातुर्याने विश्वास संपादन करणे
  • पोटाला चिमटा घेणे- अत्यंत काटकसरीने राहणे
  • पोटावर पाय देणे- रोजंदारी बंद करणे
  • पोटाशी धरणे- माया करणे, कुशीत घेणे
  • प्राणापेक्षा जपणे- स्वतःच्या जिवापेक्षा एखादी गोष्ट सांभाळणे
  • बोटावर नाचवणे- हवे तसे खेळवणे
  • मनात अढी धरणे- एखाद्याविषयी मनात राग निर्माण होणे
  • मांडीवर घेणे- दत्तक घेणे
  • मुठीत असणे- ताब्यात असणे
  • रक्त आटवणे- अतीकष्ट करणे
  • रक्ताचे पाणी करणे- अतिश्रम करणे
  • हाडांची काडे करणे- अतिकष्ट करणे
  • हाडे खिळखिळी करणे- भरपूर चोप देणे
  • हात आखडणे- देण्याची क्षमता असतानाही कमी देणे
  • हातघाईवर येणे- मारमारीची पाळी निर्माण करणे
  • हातचा मळ असणे- एखादी गोष्ट सहज करता येणे
  • हात झटकणे- नामानिराळा होणे
  • हात टेकणे- नाईलाजाने शरण येणे
  • हात दाखवणे- मार देणे, फसवणे
  • हात देणे- मदत करणे
  • हात मारणे- ताव मारणे 
  • हातातोंडाशी गाठ पडणे- जेमतेम खायला मिळणे
  • हातापाया पडणे- लाचारीने विनवण्या करणे
  • हातावर तुरी देने- डोळ्यादेखत फसवून पळणे
  • दोन हात करणे- सामना करणे, टक्कर देणे
  • हृदय भरून येणे- गदगदून येणे
See also  Do You Know Navratri Meaning in Marathi | तुम्हाला नवरात्रीचा मराठीत अर्थ माहित आहे का?

निष्कर्ष : मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

तर मित्रांनो आत जर आपणास वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा म्हणून कोणी विचारले तर आपण सहज उत्तर देऊ शकाल. हे होते मराठी भाषेतील काही प्रसिद्ध वाक्प्रचार तुम्हाला हे vakprachar in marathi कसे वाटले आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की सांगा. व तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण आपण आम्हाला विचारू शकतात.